नवी दिल्ली – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा व कर्नाटक भाजपचे प्रभारी अरुण सिंग हे देखील उपस्थित होते. यावेळी राज्यातील राजकीय परिस्थिती, मंत्रिमंडळ विस्तार व पोटनिवडणुकांसाठीच्या उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाल्याचे येडियुरप्पा यांनी सांगितले.
कर्नाटकमध्ये भाजप सरकार स्थापन होऊन वर्ष उलटले असले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यामुळे राज्यातील काही इच्छूकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा मंत्रिमंडळातील ८-९ मंत्र्यांना वगळणार असल्याचंही बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी गृहमंत्री शाह व राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट घेतली आहे.
दरम्यान, बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना येडियुरप्पा यांनी, “कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमधील भाजपच्या कामगिरीबाबत मी सविस्तर माहिती दिली. बैठकीदरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाली. पक्षश्रेष्ठी लवकरच नावांची घोषणा करणार आहेत. या विषयावरची ही १०० टक्के अखेरची बैठक आहे.” अशी माहिती दिली.
I explained to them in detail, the Gram Panchayat result. We also discussed the cabinet expansion in detail. The names will be cleared as early as possible. 100% this is the last meeting, they are going to clear the names early as possible: Karnataka CM BS Yediyurappa https://t.co/SY5IlcLqgV pic.twitter.com/Y110OX5yo6
— ANI (@ANI) January 10, 2021