अर्थमंत्री त्यांच्या पतींचा सल्ला ऐकणार का? शरद पवारांचा सवाल

मुंबई : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती प्रभाकर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहलेल्या लेखात ‘भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. मात्र हे वास्तव मान्य करण्याची सरकारची तयारी नाही असं म्हनत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

त्यावरून आता राष्ट्रवादीने सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. “जर खुद्द अर्थमंत्र्याचे पतीच असे सांगतात तर सरकार यावर गंभीरपणे विचार करणार का? यासोबतच अर्थमंत्री हा सल्ला ऐकणार का?” असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.

अकलूजमध्ये माळशिरसमधील प्रचारसभेत शरद पवार बोलत होते.‘भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. मात्र हे वास्तव मान्य करण्याची सरकारची तयारी नाही. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी वाढीचा दर ५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या ६ वर्षांमधील हा नीचांक आहे. तर बेरोजगारीच्या दरानं गेल्या ४५ वर्षांमधील उच्चांक गाठला आहे” असं प्रभाकर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या एका लेखात म्हटलं होतं.

देशाची अर्थव्यवस्था संकटातच: अर्थमंत्र्यांच्या पतींचा घरचा आहेर

“नेहरुंची आर्थिक धोरणं राबवायची नाहीत, हे भाजपा नेतृत्त्वानं निश्चित केलं आहे. अर्थव्यवस्था संकटात असण्यामागचं हे प्रमुख कारण आहे. नेहरुंची धोरणं लागू करायची नाहीत, हे जरी निश्चित असलं तरी त्याला पर्याय म्हणून काय धोरणं राबवायची, याचं उत्तर सरकारकडे नाही, अस देखील प्रभाकर यांनी लिहलेल्या लेखात म्हटल आहे. निर्मला सीतारामन यांचे पती हे हैदराबादमधील “राईट फोलियो” नावाच्या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.