नवी दिल्ली : दिल्ली विधान सभेचे वातावरण चांगलेच तापले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्लीतील प्रचार सभेत काँगेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष शाहीन बागेत घोषणा देणाऱ्या बरोबर आहेत.
देशाचे विभाजन करणाऱ्याना काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा पाठिंबा असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला. जे लोक शरजील इमाम सारख्या लोकांना पाठिंबा देतात अशा लोकांना तुम्ही मत देणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अशा लोकांना दिल्लीच्या जनतेने मतदानातून त्यांची जागा दाखवून द्यावी असे अवाहन त्यांनी केले. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील आरोप केले. गृहमंत्री म्हणाले, केजरीवालांनी निवडून आल्यावर सरकारी बंगला घेणार नसल्याचे सांगितले होते.
सरकारी गाडीचा देखील वापर करणार नाही असे केजरीवाल म्हणाले होते. मग शपत घेतल्यानंतर तुम्ही सरकारी बंगला कसा घेतला? केजरीवालांनी जनतेला दिलेली आश्वासने पाळली नसून जनतेचा विश्वासघात केल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत सर्व गरीब कुटुंबांना पक्की घरे देणार असल्याचे आज दिल्लीतील सभेला संबोधित करताना सांगितले. देशासमोर अनेक संकटे असून, संकटाला तोड देण्यासाठी आमचे सरकार प्रतिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
पुढे मोदी म्हणाले कि, विविध कल्याणकारी योजना दिल्ली सरकारने लागू केल्या नाहीत. केजरीवाल सरकारला गरिबांना घरे उपलब्ध करून द्याचे नाहीत. भाजपा सकारात्मकतेवर विश्वास ठेवतो. आमच्यासमोर देशहित महत्वाचे असून देशाला समोर ठेऊन निर्णय घेतले जातील असे ते म्हणाले.