मुंबई – भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झाल्यावर गौतम गंभीर यांनी काही निराधार व्यक्त केला आहे. सध्याच्या भारतीय संघात इतकी गुणवत्ता आहे की येत्या काळात पुढील संपूर्ण दशक आंतरराष्ट्रीय क्रिकटेवर आपले वर्स्वव राखतील. संघाला येत्या काळात एका वेगण्याच उंचीवर घेऊन जाणार, असा निर्धारही गंभीरने व्यक्त केला.
मंगळवारी रात्री बीसीसीआने गंभीर यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ यंदाच्या नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपर्यंतच होता. त्यांच्याजागी नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती करणे गरजेचे होते. आता झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत व्हीव्हीएस लक्ष्मण यांची हंगामी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, हा दौरा पार पडल्यावर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून गंभीर हा पदभार स्वीकारतील. गंभीर यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत राहील.
गौतम गंभीरची दूरदृष्टी आणि त्याचा अफाट अनुभव त्याला मुख्य प्रशिक्षकपदासाठी योग्य दावेदार ठरवतो. बीसीसीआयकडून गौतम गंभीरच्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा”, अशा शब्दांत जय शाह यांनी गौतम गंभीरचे स्वागत केले आहे.
Many thanks for your extremely kind words and constant support @JayShah bhai. Elated to be a part of this journey! The entire team together will strive for excellence and newer heights. https://t.co/BgAbTwN59u
— Gautam Gambhir (@GautamGambhir) July 9, 2024
भारत ही माझी ओळख आहे आणि देशाची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अभिमानाचा क्षण आहे. भलेही माझ्या डोक्यावर वेगळी टोपी असेल, पण मी आता भारतीय संघाचा पुन्हा एकदा भाग झालो, याचा आनंद वाटतोय. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटेल, असे काम करणे, हेच यापुढेही माझे ध्येय असेल. निळ्या जर्सीतील खेळाडू 140 कोटी जनतेचे स्वप्न आपल्या खांद्यावर घेतात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला जे काही करता येईल, ते करण्याचा मी प्रयत्न करेन, अशी भावना गौतम गंभीरने व्यक्त केली आहे.
नोव्हेंबर 2023 मध्ये भारतीय संघाचा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपली निवृत्ती घेण्याची इच्छा जाहीर केली होती. मात्र कर्णधार रोहित शर्माच्या विनंतीनंतर त्यांनी टी-20 विश्वचषकापर्यंत प्रशिक्षक पदावर राहण्याचे मान्य केले. 29 जून रोजी बार्बाडोसच्या मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने तब्बल 11 वर्षानंतर आयसीसी चषक जिंकत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला एक उत्तम भेट दिली.