विश्वजित घोडके : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळणे बंधनकारक
खटाव – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळणे सर्वांनाच बंधनकारक असल्याने उद्यापासून सर्व डीजे सील केले जातील. जिल्हाधिकाऱ्यांनीही डीजे सील करण्याचेच आदेश आहेत. ज्या गणेश मंडळांनी डीजे धारकांना सुपारी दिली असेल किंवा देणार असाल तर ती रद्द करावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आपल्या खास शैलीत पुसेगाव पोलिस स्टेशन सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी खटाव येथे पार पडलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त घेतलेल्या आढावा बैठकी आपले आडाखे, नियम, योजना व काही सुचना गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या समोर मांडल्या. याप्रसंगी खटावचे प्रथम नागरिक नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, युवा नेते राहुल पाटील व त्याच बरोबर जिल्हा परिषद सदस्य प्रदिप विधाते, माजी सरपंच बबन घाडगे व सर्व ग्रामपंचायत सदस्य आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
घोडके पुढे म्हणाले, नुकताच पार पडलेला दहीहंडी उत्सव सांगली, कोल्हापुर येथे आलेल्या महापुरामुळे खटाव परिसरातील लोकांनी साध्या पद्धतिने साजरा केला व पूरग्रतांना मदतीचा हात दिला.येणारा गणेश उत्सव ही अशाच पद्धतीने साजरा करावा. गणेशोत्सव काळात घडलेले गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असतात. त्यामुळे कायद्याचे पालन करावे. या वेळी सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते व खटावचे नागरिक बहुसंख्यने उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक व आभार ग्रामपंचायत सदस्य राहुल जमदाडे यांनी केले.