सासवड, (प्रतिनिधी) – उपेक्षित राहिलेल्या नाथपंथी डवरी आणि कोल्हाटी समाजातील बांधवांच्या सर्व अडीअडचणीत मोठ्या भावाप्रमाणे उभा राहून सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
पुरंदर-हवेलीचे आमदार आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पुरंदर तालुक्यातील वीर पंचक्रोशीतील आणि हवेलीमधील आंबेगाव-येवलेवाडी परीसरातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील नाथपंथी डवरी आणि कोल्हाटी समाजातील युवकांनी रविवारी (दि. 29) सासवड येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यावेळी आमदार जगताप बोलत होते.
काँग्रेसच्या विचारावर विश्वास ठेऊन पक्षप्रवेश केलेल्या सर्व शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातून आलेल्या युवकांचे आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस परिवारात स्वागत केले.
यावेळी नवनाथ शिंदे, रवी माळवे, विशाल माळवे, वैभव बोडरे, सौरभ माळवे, रोहीत माळवे, नरेश माळवे, सुरज शिंदे ऋषिकश माळवे, अविनाश शिंदे, सुशांत माळवे, अविनाश शिंदे,
आदित्य माळवे, ओंकार चव्हाण, रोहित माळते, तुषार माळवे, गोपाळ माळवे, धनंजय गुलदगड, सौरभ पडळकर, शुभम सावंत, धनराज शिंदे, मेघराज जगताप, अनिकेत माळवे, दत्ता माळवे, भारत जवळेकर आदींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, युवक अध्यक्ष चेतन महाजन, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय टिळेकर, माजी पं स सदस्य दिलीप धुमाळ, विठ्ठल मोकाशी, प्रकाश पवार, श्रीनाथ म्हस्कोबा वीर देवस्थानचे अध्यक्ष संतोष धुमाळ, धैर्यशील धुमाळ, युवक उपाध्यक्ष रूपेश धुमाळ,
तुषार जगताप, माजी सरपंच माऊली वचकल, सुधीर धुमाळ, राहूल खोमणे, विनोद चौरे, मंगेश धुमाळ, युवराज धुमाळ, अजित चव्हाण यासंह अनेक कार्यकर्त, पदाधिकारी उपस्थित होते.