विश्रांतवाडी : लोहगावसह वडगावशेरी मतदारसंघातील विविध भागात उत्तर भारतीय बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.सर्वजण उत्तर भारतातून नोकरी-व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून स्थायिक झालेत.परंतु सध्या महाराष्ट्रीयन झाले असले तरीसुद्धा समाजातील काही लोकांचा ते परप्रांतीय असल्याचा भ्रम आहे. त्यामुळे त्यांना अनेक समस्या निर्माण होतात.
यापूर्वी देखील आम्ही त्यांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडविल्या आहेत.यापुढे देखील त्यांना भयमुक्त जीवन जगता यावे यासाठी आपण नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे,असे सुरेंद्र पठारे यांनी सांगितले.
लोहगावातील हरणतळे, वृंदावण पार्क, गुरूद्वारा कॉलनी, रोहन अभिलाषा याठिकाणी छठ पुजेनिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी भेट देऊन उपस्थित समस्त उत्तर भारतीय समाज बांधवांना पठारे यांनी शुभेच्छा दिल्या. लोहगाव येथील हरणतळे येथे छठपुजा सेवा ट्रस्टच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी लोहगावचे माजी उपसरपंच सुनील खांदवे- मास्तर, माजी उपसभापती बंडू खांदवे, सुनीलदादा खांदवे- पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र खांदवे-पाटील, मोहनराव शिंदे-सरकार, नेहा शिंदे, तनुजा शिंदे-सरकार, सचिन खांदवे,राहुल गव्हाणे यासह लोहगावातील सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर तसेच उत्तर भारतीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन छठपुजा सेवा ट्रस्टचे अध्यक्ष निरज राय, उपाध्यक्ष मृत्यूंजय कुमार, सचिव अशोक झा या पदाधिका-यांसह समाज बांधवांनी केले होते. सूर्यास्त दर्शन तसेच सूर्य दर्शन घेण्यासाठी हरण तळ्यावर गर्दी झाली होती.