शाहरुख एटलींसोबत झळकणार?

बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेमध्ये प्रत्येक कलाकाराला चढ-उतारांचा सामना करावा लागतो. यशोशिखरावर असताना स्टारडम असतं, चाहत्यांची गर्दी असते, मीडियालाही आकर्षण असतं; पण सातत्याने चित्रपट अपयशी होऊ लागले की मग बॅडपॅच सुरू होतो. हा वाईट काळ सहन करताना भल्या-भल्या दिग्गजांची कोंडी होते. अगदी बॉलीवूडचा शहनशहा महानायक अमिताभनेही ही फेज अनुभवली आहे.

दुसरीकडे, बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान हा सध्या अशाच काहीशा फेजमधून जात आहे. सातत्याने त्याचे चित्रपट तिकीट खिडकीवर फ्लॉप ठरत आहेत. त्यामुळे एकेकाळी ज्या पुरस्कारांवर एकहाती शाहरुखची छाप असायची त्या पुरस्कारांमध्ये त्याला नॉमिनेशनही नसते. यातून बाहेर पडण्यासाठी शाहरुख सध्या बराच झटतो आहे. पण त्याला हटके एखादी फिल्म हवी आहे. यासाठी बऱ्याच स्क्रिप्टस्‌ वाचल्यानंतर आणि बऱ्याच निर्माते-दिग्दर्शकांशी चर्चा झाल्यानंतर आता शाहरुखने थेट तामिळी दिग्दर्शक एटली कुमारसोबत काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे.

एटलीच्या “बिगिल’ या चित्रपटाचा ट्रेलर सध्या इंटरनेटवर तुफान गाजतो आहे. हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. एटली येणाऱ्या काळात सुपरस्टार विजयसोबत आणखी एक चित्रपट तयार करण्याच्या विचारात होते. पण हा प्रोजेक्‍ट काही कारणांमुळे सुरू होत नाहीये. डिसेंबरपर्यंत एटलींचे शेड्युल व्यस्त आहे. त्यानंतर त्यांच्यात आणि शाहरुखमध्ये अंतिम बोलणी होतील. दरम्यानच्या काळात, अली अब्बास जफरसोबत एका चित्रपटात शाहरुख झळकणार होता, पण तो प्रोजेक्‍ट रद्द झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.