रजनीकांत निवडणूक लढविणार?

चैन्नई – दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत यांनी रजनी मक्‍कल मंद्राम (आरएमएम) पक्षाच्या पदाधिकारी आणि जिल्हा सेक्रेटरींसोबत आज बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर रजनीकांत लवकरच पुढील राजनीतीची घोषणा करणार आहे.

राघवेंद्र कल्यम मंडपममध्ये जवळपास 90 मिनिटांपर्यंत चाललेल्या या बैठकीनंतर रजनीकांत यांनी आपल्या पॉस गार्डन या बंगल्यासमोर माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना त्यांचे राजकारणाबाबतचे विचार सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले, बैठकीदरम्यान, आरएमएमच्या सदस्यांनी या गोष्टीवर सहमती दर्शविली की, राजकारणाबाबत आपण घेतलेली कोणतीही भूमिका त्यांना मान्य असेल. त्याचबरोबर माझा कोणताही निर्णय त्या सर्वांना मान्य असल्याचे प्रतिपादन सदस्यांनी केले आहे. बंद दरवाजाआड झालेल्या या बैठकीत आरएमएम कार्यकर्त्यांसोबत जिल्हा सेक्रेटरीही हजर होते.

कार्यकर्त्यांना रजनीकांत यांनी राजकारणात सक्रिय व्हावे अशी इच्छा आहे. त्याचबरोबर आगामी निवडणुकीत भाग घेण्याचीही इच्छा आहे. यावर रजनीकांत लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.