राधिकाला पुरावे मिळणार का?

“माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये राधिकाला तिचा नवरा गुरुनाथवर अजूनही विश्‍वास नाही आहे. तो विस्मरण झाल्याचे नाटक करतो आहे, असा तिला दाट संशय आहे. त्याचे खरे काय आहे, हे ओळखण्यासाठी तिने एक युक्‍ती केली आहे. ती अथर्वच्या खोलीमध्ये एक रेकॉर्डर लपवून ठेवते आणि तिला खरोखर एक छोटासा पुरावा मिळतो देखील. पण तो पुरावा सगळ्यांसमोर आणण्याऐवजी राधिका एक वेगळाच गेम प्लॅन करते आहे. तिकडे गुरुनाथची गेलेली स्मृती परत आणण्यासाठी शनाया आणि तिची मम्मा गुरूला पुन्हा त्याच घटनास्थळी नेण्याचा प्लॅन करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.