राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपमध्ये सामील होणार ? चर्चेला उधाण

मुंबई: विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजप मध्ये सामील होण्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. चक्क विरोधीपक्ष नेत्याच्या मुलानेच भाजप मध्ये प्रवेश केल्याने राधाकृष्ण विखे पाटलांना टीकेचा सामना करावा लागला. तसेच त्यांनी पदाचा राजीनामा देखील दिला.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनके पक्षातील बडे नेते भाजपमध्ये येणार असल्याचे विधान केले आहे. विरोधीपक्ष नेत्यांचा युतीकडे ओढा आहे. असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुलगा सुजय पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपमध्ये सामील होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर दक्षिणमध्ये गेल्या तीन वर्षांपासून डॉ. सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीची पेरणी केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत नगर दक्षिणची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. विखे पाटील हे कॉंग्रेसमध्ये आहेत. आघाडीत खलबते करून ही जागा पुत्रासाठी पदरात पाडून घेता येईल, अशी तयारी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र ही जागा कॉंग्रेसला न सोडता, ती राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची केली आहे. लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थिती लढवायचीच, अशा तयारीत असलेले डॉ. सुजय विखे पाटील यांनी शेवटी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)