‘त्या’ 23 गावांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – प्रशांत जगताप

वाघोली – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन व पुणे महानगरपालिका यांच्याकडून तेवीस गावांसाठी मूलभूत सुविधां व्यतिरिक्त इतर कामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले.

तेवीस गावांमधील तसेच पुणे शहरातील उपनगरातील भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या असून जगताप यांच्या हस्ते संबंधित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले याप्रसंगी जगताप बोलत होते.

वाघोली ग्रामस्थांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील व मित्र परिवाराच्या वतीने पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी आप्पा मंदाडे, अजिंक्य सातव, किशोर गडकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.