Allu Arjun and Pooja Hegde | अभिनेत्री पूजा हेगडे पुन्हा एकदा अल्लू अर्जुनसोबत पाहायला मिळणार आहे. ‘अला वैकुंठपुरमलो’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. आता, पूजा हेगडेने एका मुलाखतीत अल्लू अर्जुनसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
‘पुष्पा 2’ नंतर अल्लू अर्जुनकडे सध्या अनेक मोठमोठे प्रोजेक्ट्स आहेत. अनेक अभिनेत्रींना त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. यातच आता पूजानेही पुन्हा एकदा अल्लूसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे.
तिच्या आगामी ‘रेट्रो’ चित्रपटाच्या ऑडियो लॉन्च इव्हेंटदरम्यान, पूजा हेगडेला विचारण्यात आलं की, ती अल्लू अर्जुनसोबत पुढील चित्रपटाची योजना आखत आहे का? यावर पूजानं सांगितलं की, “जर एखादी चांगली कथा, चांगलं पात्र असेल आणि ते योग्यरित्या जुळलं तर आम्ही ते करू. अल्लू अर्जुनसोबत काम करणे नेहमीच एक आनंददायी अनुभव असतो. तो एक परिपूर्ण अभिनेता आहे आणि त्याच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळते.”
दरम्यान, पूजा हेगडेने अनेक दाक्षिणात्य सिनेमात उत्तम काम केले आहेत, त्यापैकी एक ‘रेट्रो’ आहे, जो 1 मे 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, ती थलपति विजय यांच्या शेवटच्या चित्रपट ‘जन नायकन’मध्ये देखील दिसणार आहे. Allu Arjun and Pooja Hegde |
दरम्यान, पूजा हेगडे शेवटची शाहिद कपूरसोबत ‘देवा’ चित्रपटात दिसली होती, पण हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. शाहिद कपूरपूर्वी पूजा हेगडे सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसली होती. पण या चित्रपटाचीही बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी झाली नाही. अशा परिस्थितीत आता पूजा तिचा सहकलाकार अल्लू अर्जुनसोबत पुन्हा काम करताना दिसू शकते. Allu Arjun and Pooja Hegde |
हेही वाचा:
सोनाक्षी सिन्हाच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज; अभिनेत्री दिसणार खास अंदाजात