मुंबई – पंकजा मुंडे, एकनाथ खडसेंसह काही भाजप नेते पक्षावर नाराज असून लवकरच पक्ष सोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांची नाराजी ऐकून घेतली. दोघेही पक्ष सोडणार नाहीत. या सर्व मीडियाने तयार केलेल्या बातम्या आहेत. पंकजा मुंडे यांना भाजपाचेच बाळकडू मिळालं आहे. त्यामुळे त्या पक्ष सोडणार नाहीत. तसेच उद्या गोपीनाथ गडावर मला निमंत्रण असून मी जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, युतीबाबत आपण आशावादी असून भाजपा आणि शिवसेना नैसर्गिक मित्र असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.