इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी माहिती आणि प्रसारण मंत्री आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ अर्थात पीटीआय पक्षाचे नेते फवाद चौधरी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाची अवमानना प्रकरणात वॉरंट जारी करण्यात आला आहे.
निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हजर राहण्याचे समन्स बजावूनही सातत्याने गैरहजर राहील्याबद्दल खासदार निसार अहमद दुर्रानी यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय आयोगाने चौधरी यांच्या विरोधात वॉरंट जारी केला.
आयोगाच्या खंडपीठाने चौधरी आणि त्यांच्या पीटीआय पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या विरोधात निवडणूक आयोगाचा अवमान केल्याच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा सुरू केली आहे. दरम्यान, इम्रान खान यांचे वकिल अन्य प्रकरणाच्या सुनावणीला उपस्थित असल्यामुळे आज उपस्थित राहु शकले नाही. त्यामुळे अन्य वकिलाने त्यांची बाजू मांडली.
USA vs Russia : रशिया भारताला फसवू शकतो, वेळ आली तर पुतीन चीनचीच बाजू घेतील – अमेरिका
त्यावेळी फवाद चौधरी किंवा त्यांचे वकिल कुठे आहेत अशी विचारणा खंडपीठाने केली. चौधरी तुरूंगात नसल्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करतो असे पीठाकडून सांगण्यात आले. आता पुढील सुनावणी ७ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.