संसदेत धार्मिक घोषणाबाजी करू देणार नाही – ओम बिर्ला 

नवी दिल्ली – संसदेत कोणालाही धार्मिक घोषणाबाजी करण्याची परवानगी नसल्याचे महत्वपूर्ण विधान लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले आहे. मागील काही दिवसांमध्ये खासदारकीची शपथ घेताना अनेक वेळा धार्मिक घोषणाबाजी करण्यात आली.

ओम बिर्ला म्हणाले कि, मला वाटत नाही की संसद अशी जागा आहे जिथे कोणीही घोषणाबाजी करावी, संसदेच्या वेलमध्ये येऊन बॅनर-पोस्टर झळकवावेत. निषेधासाठी एक वेगळी जागा आहे. सरकारच्या विरोधात त्यांना जे काही सांगायचे आहे ते बोलू शकतात परंतु येथे नाही.

आगामी दिवसांमध्ये घोषणाबाजी होणार नाही का? यासंदर्भात बिर्ला म्हणाले, हे होणार आहे की नाही हे मला माहिती नाही, परंतु नियमांनुसार मी संसदेत काम करेन, असे उत्तर त्यांनी दिले.

दरम्यान, संसदेत मंगळवारी शपथ घेताना अनेक सदस्यांनी धार्मिक घोषणाबाजी केली. एआयएमआयएम आणि हैद्राबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत शपथ घेतल्यानंतर अल्लाह-हु-अकबरचा नारा दिला. ओवेसी शपथ घेताना जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम् अशीही घोषणाबाजी करण्यात आली. उलट, ओवेसीने जय भीम, जय मीम, कबीर अल्लाह-हु-अकबर आणि जय हिंद अशा घोषणा दिल्या. हेमा मालिनी यांनी शपथ घेतल्यानंतर राधे राधे अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. बसपाचे सदस्य जय भीम आणि एसपीच्या सदस्यांनी जय समाजवाद्यांचा घोषणा दिल्या. कदाचित लोकसभाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल जेव्हा शपथविधीवेळी मोठ्या संख्येने खासदारांनी धार्मिक घोषणा केल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.