मुंबई – राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले. ईडीकडून शरद पवार यांना एक ईमेल पाठवण्यात आला आहे. तसेच पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनीही शरद पवार यांना निवासस्थानी जाऊन ईडी कार्यालयात न जाण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर आपण सहकार्याला तयार असून आज ईडी कार्यालयात जाणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
NCP Chief Sharad Pawar in Mumbai: I will not visit the Enforcement Directorate office for now. pic.twitter.com/7uWFRUZNql
— ANI (@ANI) September 27, 2019