दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या हिंसाचारानंतर मानव संसाधन विकास मंत्रालयाने कुलगुरूसमवेत विद्यापीठ प्रशासनाची सोमवारी बैठक बोलावली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि जेएनयूच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलण्यास सांगितले.
दिल्ली पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला:
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) हिंसाचार प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) हिंसाचाराचा निषेध करत नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच हा या संपूर्ण घटनेची स्वतंत्र न्यायिक चौकशी मागणी त्यांनी केली.
विद्यापीठांना राजकारणाचे केंद्र बनू देणार नाही:
मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयलयांनी विद्यापीठांना राजकारणाचे केंद्र बनू देणार नाही, असे म्हटले आहे.