सत्तेची हवा डोक्यात कधी ठेवणार नाही – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

रेडा (प्रतिनिधी) : इंदापूर चे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे हे खर्‍याला खरं व खोट्याला खोटं थेट बोलून दाखवत होते. माझ्या चांगल्या कामावर खूश असायचे, मला म्हणायचे तुमचे चांगले काम आहे.तुम्ही करता ते काम पाहून मला आनंद होतो.

त्यांनी सत्तेची हवा डोक्यात मामा कधी घेऊ नका असा सल्ला मला दिलेला आहे. त्यामुळे रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या शिकवणीनुसार कधीही सत्तेची हवा डोक्यात ठेवणार नाही.अशी ग्वाही देत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्रद्धांजली वाहिली.

इंदापूर येथील भिमाई आश्रम शाळा येथे रत्नाकर मखरे यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी राज्यमंत्री भरणे बोलत होते.

पुढे बोलताना राज्यमंत्री भरणे म्हणाले की,गरीब उपेक्षित संकटात सापडलेल्या झोपडीतल्या लोकांसाठी अहोरात्र काम रत्नाकर मखरे यांनी आयुष्यभर केले आहे. मखरे तात्या आज जरी आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांचे विचार नव्या पिढीला स्फूर्ती देणारे असणार आहेत.

परखड व्यक्तिमत्त्व इंदापूर तालुक्याला तात्यांच्या रुपाने लाभले होते,गोरगरिबांची असंख्य मुले भिमाई आश्रम शाळेतून घडली आहेत,घडणार आहेत. याचे श्रेय रत्नाकर मखरे यांना जाते. त्यामुळे संपूर्ण परिवाराच्या पाठीशी कायम खंबीर उभा असणार आहे अशीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.