मुंबई – बॉलिवूड सुपरस्टार ‘हृतिक रोशन’ केवळ भारतातच नाही तर जगभर आपल्या दमदार अभिनयामुळे आणि हॅंडसम पर्सनॅलिटीमुळे प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून तो आपल्या लुक आणि आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतो आहे.
अलीकडेच ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशनचा ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष २०१९’च्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच, यापूर्वी ‘टॉप फाइव्ह मोस्ट हॅन्डसम मेन इन द वर्ल्ड’ या यादीमध्ये हृतिकने स्थान पटकावला होते.
दरम्यान, अजूनही हृतिक आपला हॅन्डसम लूक कश्या प्रकारे मेंटेन ठेवतो हे आपण जाणून घेऊया. हृतिक चित्रपटाच्य गरजेप्रमाणे वर्कआऊट करतो. जास्त करून तो कार्डिओ आणि स्ट्रेंथ करतो. त्याचा ट्रेनर क्रिस गेथिन नेहमी त्याच्याकडून वर्कआऊट करून घेतो.
हृतिक पोटभर जेवण घेत नाही. उलट तो थोड्या थोड्या वेळानं थोडं थोडं खात असतो. त्यामुळे त्याचा मेटॅबोलिझम चांगला राहतो. तो प्रोटिन डाएट घेतो. त्याच्यासाठी तो एग व्हाइट, चिकन आणि प्रोटीन शेक घेतो. त्याबरोबर बटाटा, ब्राऊन राईस, ओट्स खातो. सोबत भाज्याही भरपूर खात असतो.