Jio Cinema | उद्योगपती मुकेश अंबानी यांचा ‘जिओ सिनेमा’ हा OTT प्लॅटफॉर्म लवकरच बंद होऊ शकतो. रिलायन्स जिओची मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डिस्ने यांच्यातील अधिग्रहण करार आता जवळपास निश्चित झाला आहे. हा करार पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा कधीही केली जाऊ शकते. हा करार पूर्ण झाल्यानंतर डिस्नेच्या स्टार नेटवर्कचा संपूर्ण व्यवसाय मुकेश अंबानींचा असेल. त्यादृष्टीने मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.
एकाच ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर
विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर, रिलायन्सकडे OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar असेल. इकॉनॉमिक टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने एका अहवालात म्हटले आहे की, विलीनीकरणानंतर मुकेश अंबानींची कंपनी दोन वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मऐवजी एकच प्लॅटफॉर्म ठेवू शकते.
रिलायन्सची उपकंपनी Viacom 18 आणि Star India यांचे विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर, ‘Jio Cinema’ ला ‘Disney + Hotstar’ मध्ये विलीन केले जाऊ शकते. कंपनी शेवटी Disney + Hotstar प्लॅटफॉर्म चालू ठेवू शकते, तर Jio सिनेमा बंद करू शकते. Jio Cinema च्या आधी, Viacom 18 चे स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म ‘Voot’ होते, जे नंतर कंपनीने Jio Cinema मध्ये विलीन केले.
यामागचं कारण काय ?
डिस्ने हॉटस्टारमध्ये जिओ सिनेमा विलीन करण्याचे एक कारण म्हणजे डिस्ने हॉटस्टारचे गुगल प्ले स्टोअरवर 50 कोटींहून अधिक डाउनलोड आहेत. तर Jio सिनेमाच्या डाऊनलोडची संख्या फक्त 10 कोटी आहे. एवढेच नाही तर डिस्ने हॉटस्टारचे 3.55 कोटी पेड सब्सक्राइबर आहेत. हे लक्षात घेता मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
“उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय…;” संजय राऊतांचे पटोलेंच्या नाराजीनंतर स्पष्टीकरण