नवी दिल्ली – जगभरात 200 मिलियन लोक व्हॉटसअपचा वापर करतात मात्र, त्या माध्यमातून येणाऱ्या फेक न्युजमुळे यापूर्वी काही ठिकाणी सामाजिक अशांतता निर्माण झाली तर काही ठिकाणी दंगली घडल्या आहेत. या व्हॉटसअप अफवा पसरवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण भारतात व्यापार करणाऱ्या सोशल माध्यमांना नवीन नियमावली दिली आहे तसेच या नियमावली नियम जर लागू झाले तर व्हॉटसअपची सेवा बंद होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दर्शवली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, केंद्र सरकारने आखलेल्या नियमावलीमधील नियमानुसार व्हॉटसअपमध्ये आलेल्या मेसेजला ट्रेस करणे हे होय आहे. मात्र नियमाचे पालन व्हॉटसअपद्वारे होणार नसल्याचे व्हॉटसअप कम्यूनिकेशन प्रमुख कार्ल वूग यांनी सांगितले. व्हॉटसअपमध्ये एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन फीचर आहे. या फीचरमुळे व्हॉट्सअपवर पाठवणारा आणि ज्याला मेसेज मिळाला आहे, असे दोघेच हा मेसेज वाचू शकतात. सुरक्षेच्या दृष्टीने एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन फीचर खूप महत्त्वाचं आहे. या नियमावली नियम जर लागू झाले तर व्हॉटसअपची सेवा बंद होण्याची शक्यता आहे. या नवीन नियमांसदर्भात सरकारी पातळीवर चर्चा सुरू आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा