एका जागेवर अदलाबदल; हडपसर शिवसेनेला सोडण्याचे संकेत
पुणे – जिल्ह्यातील सर्वांत लक्षवेधी ठरलेल्या इंदापूर विधानसभेची जागा युतीच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेकडे आहे. मात्र, कॉंग्रेसचे मातब्बर नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर इंदापूरचा जागेचा प्रश्न चर्चिला जात आहे. मात्र, जागावाटपात इंदापूर भाजपकडे जाण्याच्या शक्यतेने जोर धरला आहे. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. यात हडपसरची जागा ही शिवसेनेला सोडून त्या मोबदल्यात इंदापूर भाजपकडे जाण्याचे संकेत मिळत आहेत.
विधानसभा निवडणुकीत 2014 मध्ये भाजप-शिवसेनेचा काडीमोड झाल्यानंतर दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. यात भाजपने पुणे शहरातील आठ जागांवर विजय खेचून आणला. त्यावेळी शिवसेनेच्या ताब्यातील हडपसरची जागा हातून निसटली. शिवसेना सत्तेच्या परीघाबाहेर राहिल्यानंतर पुन्हा भाजप सरकारमध्ये सहभागी झाली. 2014 पासून पुण्यातील शिवसेनेचे प्राबल्य कमी होत गेले. महापालिकेतही फारसा करिष्मा दाखविता आला नाही. 2019 मधील लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेत आयारामांची गर्दी वाढू लागली. त्यात जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या इंदापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. ही जागा शिवसेनेच्या कोट्यात असताना पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर जागावाटपाच्या चर्चेला आणि युतीच्या फॉर्म्युलाची चर्चा झडू लागली. युतीच्या जागावाटपाचा तिढा सुटत असताना इंदापूरच्या जागेवर अदलाबदलाची चर्चा जोर पकडली आहे.
पुणे शहरातील आठही जागांवर भाजपचे विद्यमान आमदार आहेत. यातील शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर आहेत. त्यामुळे शिवसेनेने हडपसरच्या जागेवर दावा ठोकला आहे. यातूनच हडपसरच्या मोबदल्यात इंदापूरची जागा भाजपच्या वाट्याला येणार असल्याची चर्चा आहे. “हडपसर व्हाया इंदापूर’, अशी जागावाटप होण्याची शक्यता आहे.

पुणे शहरातील एका जागा सोडणार?
भाजप आणि शिवसेना युतीच्या जागावाटपाचा तिढा आता दोन दिवसांत सुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पुण्यातील एका जागेवर भाजपला पाणी सोडावे लागणार आहे. पुण्यात भाजपचे आठ आमदार आहेत. त्यात मागील निवडणुकीत शिवसेनेच्या ताब्यात हडपसरची जागा भाजपने खेचून आणली होती. हडपसर मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांचे वर्चस्व आणि शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. त्याचा फायदा शिवसेनेला ऊर्जितावस्था आणणारा आहे. मागील निवडणुकीत बाबर हे पराभूत झाले होते. आता, जागावाटपात बाबर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
इंदापूरच्या चर्चेला पूर्णविराम…
पुण्यातील जागावाटपात अदलाबदल करून इंदापूर विधानसभेसाठी हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून वाट मोकळी करून दिली जाणार असल्याचे समजते. इंदापूरची जागा शिवसेनेच्या कोट्यात असतानाही हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या छावणीत दाखल झाल्यानंतर चर्चेला उधाण आले होते. सहकारातील अभ्यासू आणि ज्येष्ठ नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आदी कारणांमुळे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एक जागा शिवसेनेला मोकळी करून इंदापूरचा गड काबीज करण्याची रणनीती आखली आहे.
हडपसरला कंगोरे आणि मनोरे…
जिल्ह्यात शिरूर लोकसभेत शिवसेनेचे वर्चस्व आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या मतदारसंघातील आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर-हवेली, हडपसरमध्ये त्यांनी मजबूत संघटन केले आहे. तसेच, लोकसभा मतदारसंघातील शहरी तोंडवळा लाभलेला हडपसर मतदारसंघ शिरूर मतदारसंघात समाविष्ट आहे. हडपसरने आतापर्यंत आढळराव पाटील यांना साथ दिली आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आढळराव पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे भविष्यातील राजकारणाचा वेध घेऊन शिवसेनेकडून हडपसरच्या जागेसाठी हट्ट धरला आहे. त्यामुळे युती झाल्यानंतर हडपसरची अदलाबदल ही केवळ औपचारिकच राहणार असल्याची शक्यता आहे.