विकासकामांना प्राधान्य देणार : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड – मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. यापुढील काळातही गावागावातील विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. शेवाळेवाडी-टाळगाव, ता. कराड येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या फांडातून मंजूर झालेल्या मुख्य रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण कामाचे उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, नितीन थोरात-सवादेकर, उदय पाटील-उंडाळकर, सरपंच मारुती सुतार, स्वा. सै. गोपाळराव थोरात, आनंदा पाटील, प्रशांत शेवाळे, प्रा. ए. जी. थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, शेवाळेवाडी नं. 2 (उंडाळे) येथील रस्ता कॉंक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन आ. चव्हाण यांच्या झाले. यावेळी आ. चव्हाण यांनी शेवाळवाडी (टाळगाव) येथील ग्रामस्थांबरोबर चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. व स्मशानभूमी प्रश्नी लक्ष देणार असल्याचे आ. चव्हाण यांनी मान्य केले. तसेच गावच्या विकासासाठी सर्वोत्तपरी मदत करण्याची ग्वाही दिली. पृथ्वीराजबाबा मुख्यमंत्री असताना शेवाळेवाडी येथील अंतर्गत सर्व रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण झाले आहे.

यावेळी प्रशांत शेवाळे यांनी स्वागत केले. कार्यक्रमास आनंदा लकडे, मारुती शेवाळे, भीमराव शेवाळे, संजय खंडागळे, दत्तात्रय शेवाळे, रघुनाथ शेवाळे, वसंत शेवाळे, कृष्णत शेवाळे, बाळकृष्ण शेवाळे, शामराव शेवाळे, खाशाबा शेवाळे, आशुतोष शेवाळे, विनायक शेवाळे, शरद खंडागळे, ग्रामपंचायत सदस्या वनिता शेवाळे, योगिता शेवाळे, विद्या शेवाळे यांच्यासह शेवाळेवाडी (टाळगाव) व शेवाळेवाडी नं. 2 (उंडाळे) येथील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.