नुकतीच ९७ व्या अॅकॅडमिक म्हणजेच अॅास्कर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनोरा या चित्रपटाला सर्वात्कृष्ठ चित्रपटाचा अॅास्कर पुरस्कार मिळाला. मोठ्या दिमाखात लॅास एॅजिलन्स येथील डॅाल्बी थिएटरमध्ये अॅास्कर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. हा पुरस्कार सोहळा २ मार्चच्या अगोदरच होणार होता मात्र, लॅास एॅजिलन्स येथे लागलेल्या वणव्यामुळे हा सोहळा या दिवशी घेण्यात आला. अनोरा चित्रपटाला वेगवेगळ्या कॅटेगिरीत एकूण चार पुरस्कार मिळाले आहेत. यामुळे एक नवा इतिहास अनोरा चित्रपटाने आपल्या नावे केला आहे. सर्वाधिक १३ पुरस्कार हे एमिलीया पॅरेझ या चित्रपटाला मिळाले आहेत.
अॅास्करमध्ये इंडिपेन्डंट चित्रपटाला मानाचे स्थान
मूळात एखादा चित्रपट ज्यावेळी तयार केला जातो. त्यावेळी त्या चित्रपटासाठी मोठी टीम कार्यरत असते. अफाट पैसे त्या चित्रपटावर लावण्यात येत असतात. पण कधीकधी हे गणित सांभाळताना चित्रपटाचा आशय विरळ होऊन जातो. पण अॅास्कर पुरस्कार मिळवलेल्या अनोरा चित्रपट खूपच कमी बजेट करून तयार करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक शॅान बेकरने पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले.
अनोराची चार पुरस्कारांवर मोहर
अनोरा या चित्रपटाने एकूण पाच पुरस्कार जिंकले आहेत. यामध्ये बेस्ट पिक्चर, बेस्ट डिरेक्टर, बेस्ट अॅक्टर, बेस्ट इडिटिंग, बेस्ट ओरिजनल स्क्रीन प्ले या कॅटेगरीच्या पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहर उमटवली आहे. अॅास्करमध्ये एकूण २३ कॅटेगिरीत पुरस्कार दिले जातात. दिग्दर्शक शाॅन बेकर २००४ पासून चित्रपट निर्मिती करत आला आहे. त्याने याअगोदर काही फिचर फिल्म्सची निर्मिती केलेली आहे. महत्वाची बाब म्हणजे असे अॅास्करच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच होते आहे की एका चित्रपटासाठी एकाच व्यक्तीला चार पुरस्कार मिळाले आहेत. याअगोदर वॉल्ट डिस्नेने १९५३ मध्ये चार वेगवेगळ्या चित्रपटांसाठी पुरस्कार जिंकले होते.
अनोराची कहाणी काय आहे ?
अनोरा चित्रपटाने अनेक फिल्म फिस्टवल्सची वारी केलेली आहे. या चित्रपटात एका सेक्स वर्कर्सची स्टोरी दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटातील मुख्य पात्राचे नावाच अनोरा आहे. अनोरा ही एक सेक्स वर्करचे काम करत असते. ही भूमिका मिकी मॅडिसन या अभिनेत्रीने साकारलेली आहे. एकदिवशी एका तरुणासोबत तिची ओळख होते. त्यानंतर दोघांमध्ये प्रमाचे नातेसंबंध तयार होतात. पुढे हे दोघेही लग्न करतात. पण दरम्यानच्या काळात कोणकोणत्या घडामोडी घडतात. यावर चित्रपटात भाष्य करण्यात आलेले आहे. या चित्रपटात अनोराची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिकी मॅडिसन हिला सर्वात्कृष्ठ अभिनेत्रीचा अॅास्कर पुरस्कार मिळालेला आहे.
अॅास्कर एमिलीया पॅरेझ चित्रपटालाचा मिळणार होता… पण
खरंतर यंदाचा अॅास्कर एमिलीया पॅरेझ या चित्रपटालाम दिला जाणार असल्याचे वाटत होते. अभिनेत्री कार्ला सोफिया गॅस्कन यांनी एक अवमानजक ट्वीट केल्यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. तसेच चित्रपटाचे नाव समोर येत होते. अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय लोकांसाठी त्यांनी एक अवमानजक ट्वीट केले होते. त्यानंतर त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती. मात्र, त्याचा काहीही एक परिणाम झाला नाही. यामुळे एमिलीया पॅरेझ चित्रपटाला सर्वात्कृष्ठ म्हणण्यापासून दूर राहिला असल्याचे कारण सांगितले जाते.
रेड कार्पेटवर बॅालीवूड कलाकार नाही
यंदांच्या वर्षी अनुजा या इंडियन शॅार्ट फिल्मेने अॅास्करमध्ये फायनल नामोनेशल मिळाले. ही शॅार्ट फिल्म प्रियांका चोप्रा यांची निर्मिती असलेली आहे. २०२३ मध्ये अॅास्करच्या रेड कार्पेटवर बॅालीवूड अभिनेत्री दिपिका पादुकोन दिसली होती. त्यानंतर २०२४ आणि आता २०२५ मध्ये कोणताही बॅालीवूड कलाकार अॅास्कार सोहळ्यासाठी आलेले नाहीत.
अॅास्कर पुरस्कारांची यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट: अनोरा
सर्वोत्तम अभिनेता: द ब्रुटालिस्टसाठी अॅड्रियन ब्रॉडी
सर्वोत्तम अभिनेत्री: अनोरासाठी मिकी मॅडिसन
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता: अ रिअल पेनसाठी किरन कल्किन
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री: एमिलिया पेरेझसाठी झो सलडाना
सर्वोत्तम दिग्दर्शक: अनोरासाठी शॉन बेकर
सर्वोत्तम छायाचित्रण: द ब्रुटालिस्टसाठी लोल क्रॉली
सर्वोत्तम मूळ पटकथा: अनोरासाठी शॉन बेकर
सर्वोत्तम रूपांतरित पटकथा: कॉन्क्लेव्ह
सर्वोत्तम मूळ संगीत: द ब्रुटालिस्टसाठी डॅनियल ब्लूमबर्ग
सर्वोत्तम ध्वनी: ड्यून भाग दोन
सर्वोत्तम दृश्य प्रभाव: ड्यून भाग दोन
सर्वोत्तम मूळ गाणे: एमिलिया पेरेझमधील एल माल
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्य चित्रपट: आय एम स्टिल हिअर
सर्वोत्तम माहितीपट लघुपट: द ओन्ली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा
सर्वोत्तम संपादन: अनोरा
सर्वोत्तम माहितीपट वैशिष्ट्य चित्रपट: नो अदर लँड
सर्वोत्तम अॅनिमेटेड चित्रपट: फ्लो
सर्वोत्तम अॅनिमेटेड लघुपट: इन द शॅडो ऑफ द सायप्रस
सर्वोत्तम पोशाख डिझाइन: पॉल टेझेवेल विक्ड
सर्वोत्तम मेकअप आणि हेअर स्टायलिंग: द सबस्टन्स
सर्वोत्तम प्रोडक्शन डिझाइन: विक्ड
सर्वोत्तम लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म: आय एम नॉट अ रोबोट