लाखेवाडीचा सर्वांगीण विकास करणार

श्रीमंत ढोले ः ढोले मळा येथे रस्त्याचा कामाचा शुभारंभ

रेडा- लाखेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व भागांचा विकास करण्यासाठी शासनाचा निधी मोठ्या प्रमाणात येत आहे. या गावाचा चेहरामोहरा बदलून गावचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी दिली.

इंदापूर तालुक्‍यातील लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या पंचवीस पंधरा निधी अंतर्गत ढोले मळा रस्ता मानेमळा कॅनॉल रस्ता या दोन रस्त्याच्या कामाचा प्रारंभ श्रीमंत ढोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. लाखेवाडी गावचे सरपंच सोमनाथ भिंगारदिवे यांच्यासह विकास सोसायटीचे चेअरमन संचालक तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लाखेवाडी गावचे सुपुत्र व नगर विकास विभागाचे खाजगी सचिव दिलीप ढोले यांनी सातत्याने लाखेवाडी गावच्या विकासासाठी पाठपुरावा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मानेमळा अनपट वस्ती व लाखेवाडी गावातील ग्रामस्थांनी मागणी केलेल्या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे या माध्यमातून जात आहे. गावाच्या अंतर्गत असणाऱ्या वाड्या-वस्त्यांवर परिपक्व रस्ते निर्माण करण्याचा मानस ग्रामपंचायतीचा आहे, असे श्रीमंत ढोले यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.