पुढचे 25 वर्ष शिवसेना सत्तेत राहणार; संजय राऊतांचा एल्गार

मुंबई – देशभरात शिवसेनेचे सरकार हे ठाकरे सरकार म्हणून ओळखले जाते, ते पाच वर्ष पूर्ण करणार. पुढल्या पाच वर्षांनी सुद्धा सत्तेत येणार आणि त्यापुढील 25 वर्षांचा जनतेसोबत करार करून सत्तेत राहणार, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. ते शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलत होते.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी मुंबईत 200 कोटी पाठवल्याचे काही जण सांगतात. पण मुंबईसाठी 200 कोटी हा आकडा खूप कमी आहे. तुम्हाला शोभतील असे 2000 कोटी, 5000 कोटी असे आकडे सांगा. कोणी कितीही कारस्थानं केली तरी, ठाकरे सरकार राहणार. आमच्यामागे 11 कोटी जनतेचा आशिर्वाद आहे, असे राऊत म्हणाले.

एक शिवसैनिक लाख शिवसैनिक, आपण सगळे मराठी आहोत, असेही राऊत म्हणाले. तसेच विरोधीपक्षनेते देवंद्र फडणवीस यांना कोरोनातून आराम मिळावा आणि ते पुन्हा राज्याच्या सेवेत रूजू व्हावेत अशी अपेक्षा आहे, कारण समोर कोणतरी पैलवान पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.