मुंबई – बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘सिंघम’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. या सिनेमाच्या दोन्ही भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता दिग्दर्शक रोहित शेट्टी या सिनेमाचा तिसरा भाग घेऊन येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सिंघम अगेन’ असे आहे. नुकतेच या चित्रपटाची रिलीज डेट सांगण्यात आली आहे.
‘सिंघम अगेन’ सिनेमाच्या शूटिंगला या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून सुरूवात होणार आहे. हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. फिल्म समीक्षक तरण आदर्श यांनी सिंघम अगेनच्या रिलीजच्या तारखेबद्दल खुलासा केला आहे. तरण आदर्श यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. दरम्यान, अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी अनेक प्रोजेक्ट एकत्र केले आहेत. त्यांच्या ‘सिंघम’, ‘सिंघम रिटर्न्स’, सिम्बा’ या सारखे चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. हा चित्रपट लोकांना चांगलाच आवडला होता. मात्र त्यानंतर रिलीज झालेल्या अजयच्या ‘भोला’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. आता अजयचा ‘मैदान’ हा क्रीडाविषयक सिनेमा 23 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक सय्यद अब्दुल रहीम यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे.