हद्दपारीच्या निर्णयाला आव्हान देणार : मल्ल्या

लंडन : आपल्याला भारताच्या हवाली करण्याचा जो आदेश ब्रिटन सरकारने दिला आहे त्याला आपण कायदेशीर आव्हान देणार आहोत असे उद्योगपती विजय मल्ल्या याने म्हटले आहे. ब्रिटनच्या गृह सचिवांनी मल्ल्या याला भारताच्या ताब्यात देण्याच्या आदेशावर कालच स्वाक्षरी केली आहे त्यावर प्रतिक्रीया देताना त्यांने हे प्रतिपादन केले.

येत्या 14 दिवसात मल्ल्या याने ब्रिटनच्या उच्च न्यायालयात ही आव्हान याचिका सादर करणे आवश्‍यक आहे. त्यानुसार आपण योग्य तो उपाययोजना करीत आहोत असे त्याने म्हटले आहे. ब्रिटनच्या गृह सचिवांच्या आदेशाशिवाय आपल्याला ही आव्हान याचिका करणे शक्‍य नव्हते त्यानुसार आता आपला मार्ग मोकळा झाला आहे असे त्यांनी म्हटले आहे. मल्ल्या याच्यावर भारतीय बॅंकांचे नऊ हजार कोटी रूपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)