नवी दिल्ली – भारताचा अष्टपैलू फलंदाज, माजी कर्णधार, यष्टीरक्षक अशी ओळख असलेल्या ‘महेंद्रसिंग धोनी’ने काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 15 आॅगस्ट 2020 रोजी इंस्टाग्रामवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घेत असल्याची घोषणा धोनीने केली होती. तेव्हा पासून धोनी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसला नाही. महेंद्र सिंग धोनी एकदिवसीय विश्वकरंडक 2019 च्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटची मॅच खेळला होता. मात्र, असं असलं तरी धोनी आयपीएल खेळत राहणार आहे.
दरम्यान, धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे, पण तरीही त्याचे वलय मात्र कमी झालेले नाही. धोनी आता 41 वर्षांचा झाला आहे. पण तरीही तो आयपीएल खेळतो. आयपीएलपूर्वी धोनी कसून सराव करतो, यात कोणतीच गोष्ट नवीन नाही. सरावा दरम्यानचे त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच धोनीचा चेन्नई सुपर किंग्ससाठी सराव करत असतानाच एक फोटो समोर आला होता. या फोटोत धोनी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात आहे. पण धोनीच्या सरावापेक्षा किंवा फटक्यापेक्षा त्याच्या हाताच्या दंडाची (बायसेपची) जोरदार चर्चा रंगली होती. जोरदार ताकदीच्या बळावर धोनीने अनेक सामन्यांवर आपले नाव कोरले आहे.
दरम्यान, अश्यातच आता आणखी एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये ‘कॅप्टन कूल’ धोनी बॅटिंग आणि बॉलिंगचा सराव करताना दिसतोय. त्यामुळे धोनी या पर्वात बॉलरची भूमिकाही बजावणार की काय? असा सवाल क्रिकेट प्रेमींना पडला आहे. त्याचा हा व्हिडीओ चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकृत इंस्टग्राम आकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
हा व्हीडिओ भन्नाट पद्धतीने एडीट करण्यात आला आहे. या व्हीडिओमध्ये एका बाजूला धोनी बॉलिंगची एक्शन करुन बॉल टाकतो तर दुसऱ्याच बाजूला धोनी बॅटिंगसुद्धा करतोय. हा व्हीडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीला पडला आहे. त्यामुळे आता धोनी बॉलरच्या भूमिकेत दिसणार का? अश्या अनेक कमेंट या व्हिडिओवर आल्या आहेत. दरम्यान, धोनी हा आयपीएलमधील यशस्वी कर्णधार आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात टीमला 4 वेळा चॅम्पियन केलं आहे.