नारायणगाव -जुन्नर तालुक्यातील युवक व युवतींना रोजगार मिळण्यासाठी व जुन्नरच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी जुन्नरचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे विचार आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले.
जुन्नरच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी सह्याद्री वाइल्ड लाईफ कॉंटेस्ट जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन मोबाईल फोटोग्राफी 2020 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी भाऊसाहेब देवाडे, सूरज वाजगे, बाळासाहेब सदाकाळ, अजिंक्य घोलप उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून संतोष ढोबळे, शांताराम बाम्हणे, प्रशांत टाकळकर काम पाहिले.
या स्पर्धेचे आयोजन अविनाश सुभाष सांगडे, अनिकेत डुकरे, निखिल वळसे, अभि ताजवे यांनी केले. स्पर्धेमध्ये प्रथम -अमोल उल्हास ढोबळे, द्वितीय – रोहित बबन चव्हाण, तृतीय – तन्मय नवनाथ वायकर, उत्तेजनार्थ – संज्योत बाळसराफ, अदिती मांडे, कौस्तुभ चौधरी, मयूर भालेराव यांनी पटकविले.