अनुष्का ‘त्या’ खेळाडूशी लग्न करणार ?

मुंबई – बॉलीवूडच्या नवोदित कलाकारांमधील अफेअर्सबाबत “कल हो न हो’ अशी स्थिती असते. कधी आणि कोणत्या क्षणी या प्रेमीयुगुलांमध्ये ठिणगी पडेल आणि गाडी ब्रेकअपच्या वळणावर जाईल याचा नेम नसतो.


अर्थात, हे केवळ हिंदी सिनेसृष्टीतच घडते असं नाही तर आपल्या अवतीभवतीही घडतं. दाक्षिणात्य सिनेसृष्टीही याला अपवाद नाही. दक्षिणेतील लोकप्रिय सुपरस्टार प्रभास आणि अनुष्काचेच घ्या ना ! या दोघांच्या जोडीला स्क्रिनवर प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. पण दोघांनाही त्यांच्यातील नात्याविषयी विचारलं की अफवा आहेत असं सांगत असत. इतकंच नव्हे तर अशीही चर्चा आहे की, अनुष्का सध्या एका भारतीय क्रिकेटपटूला डेट करत आहे ! त्यांच्यात नेमकं काय बिनसलं असेल याचे तर्कवितर्क आता सुरू आहेत!

 

View this post on Instagram

 

🥰😍

A post shared by AnushkaShetty (@anushkashettyofficial) on

दरम्यान, या चर्चा इथवर पोहोचल्या की चक्क अनुष्का ‘त्या’ खेळाडूशी लग्न करणार असल्याचंही म्हटलं गेलं. पण, हा खेळाडू नेमका कोण, याविषयी मात्र  आपल्या वैयक्तिक जीवनाविषयीच्या या सर्व गोष्टींविषयी आता खुद्द अनुष्कानेच मौन सोडलं आहे. एका वृत्तानुसार वृत्तानुसार, लग्नाविषयी बरंच बोललं गेलं, बोललं जाईलही. किंबहुना काही माध्यमांच्या वृत्तानुसार ती विवाहितही आहे, असं म्हणत आपल्या लग्नाचा निर्णय हा पालकांवरच सोडल्याचं अनुष्काने या मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं.


अनुष्काने तिच्या खासगी आयुष्याविषयी उघड केलेली ही माहिती पाहता किमान यापुढे तर कोणा व्यक्तीशी तिचं नाव जोडलं जाणार नाही हे खरं. शिवाय आता खुद्द अनुष्काच ती कधी, केव्हा आणि कोणासोबत लग्नबंधनात अडकणार हे सांगते याबाबतची उत्सुकता असेल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.