Aishwarya and Abhishek Bachchan | ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे बॉलीवूड मधील एक ग्लॅमरस दांपत्य आहे. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र सध्या त्यांच्या चित्रपट कारकिर्दी विषयी तसेच वैयक्तिक जीवनाविषयी सतत वेगवेगळी चर्चा सुरू असते. दोघांचे लग्न एप्रिल 2007 मध्ये झाले आणि त्यांना नोव्हेंबर 2011 मध्ये आराध्या नावाची कन्या झाली. सध्या ते दोघे वेगळे राहत असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.
दोघांच्या रिलेशनशिप विषयी विविध अफवा सुरू आहेत. परंतु तरी सुद्धा दोघेही एकत्रितपणे मणीरत्नम यांच्या दिग्दर्शना खालील प्रोजेक्टमध्ये एकत्रित काम करताना दिसणार आहेत. त्यामुळेच या संभाव्य प्रोजेक्ट विषयी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे.
याआधी हे दोघे ‘गुरु’ चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यानंतर 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या रावन चित्रपटातही दोघे एकत्र दिसले होते. त्याखेरीज त्यांनी ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘कुछ ना कहो’ आणि स’रकारराज’ या चित्रपटात एकत्रितपणे काम केलेले आहे. त्या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री आणि मनीरत्नम यांचे दिग्दर्शिय कौशल्य यामुळे या संभाव्य कलाकृती विषयी चाहत्यांच्या मनामध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून मनिरत्नम काय जादुई कलाकृती निर्माण करणार आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
मनिरत्नन हे भारतातील अतिशय प्रख्यात असे दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखालील चित्रपटांचा प्रेक्षकांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. त्यांच्या चित्रपटाची कथा सांगणारी शैली आणि चित्रपटातील प्रत्येक फ्रेम उठावदार असल्यामुळे त्यांचे चित्रपट नेहमीच गाजले आहेत.
अभिषेक बच्चनने पहिल्यांदा मनिरत्नम यांच्या बरोबर 2004 मध्ये ‘युवा’ चित्रपटासाठी काम केले होते. त्याने मनिरत्नम यांच्या विषयी कृतज्ञता आणि आदर व्यक्त केला असून युवा नंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या कथित घटस्फोटांच्या कथा सोशल मीडियावर सध्या रंगवून सांगितल्या जातात आहेत. अमुक कार्यक्रमात फक्त दोघांपैकी एक जण उपस्थित होता किंवा कुठल्या कार्यक्रमाला तो दोघे वेगवेगळ्या वेळी आले याची चर्चा होताना दिसते. त्यातच अभिषेकने इंस्टाग्रामवर ग्रे डायव्होर्सेस मथळ्याखाली पोस्ट टाकल्यामुळे अफवांचा बाजार वाढला होता.
मणिरत्नम यांचा संभाव्य प्रकल्प पुढे गेला आणि पूर्ण झाला तर मणिरत्नमच्या चाहत्यांखेरीज अभिषेक ऐश्वर्याच्या चाहत्यांना देखील ट्रीट ठरणार आहे. त्याखेरीज त्यातून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यातील नाते घट्ट असल्याचे अधोरेखित होणार आहे. अद्याप या चित्रपटाची कथा उघड झालेली नाही.