मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज काँग्रेसकडून 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे घटस्थापनेचा मुहुर्त साधत शिवसेनेकडूनही काही उमेदवारांची संभाव्य यादी निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या यादीत युवासेना प्रमुख ‘आदित्य ठाकरे’ यांचे देखील नाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे वरळी विधानसभा मतदार संघातून आदित्य विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच जवळपास निश्चित मानलं जात आहे.
Shiv Sena gives AB form to its incumbent MLAs, authorizing them to file their nominations as Shiv Sena candidates for 2019 Maharashtra Assembly Elections. pic.twitter.com/sQKR5JB7hk
— ANI (@ANI) September 29, 2019