“विकिपिडीया’ वयात आली…

दोन दशकांची वाटचाल यशस्वी

पुणे – पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टीचे अधिकृत संदर्भ शोधताना जे स्थान पूर्वीच्या काळात “एनसायक्‍लोपिडीया ब्रिटानिका’ला होते, तेच स्थान ऑनलाईन/इंटरनेटच्या युगात मिळवलेल्या आणि कमालीली लोकप्रिय असलेली “विकिपिडीया’ ही वेबसाईट वयात आली असून, आपल्या स्थापनेचा 20 वा वाढदिवस “विकिपिडीया’ने नुकताच 15 जानेवारीला साजरा केला. त्यानिमित्त या वेबसाईटवर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचे पहायला मिळाले.

“एक ऑनलाईन विश्‍वकोश’ असा लौकीक मिळालेल्या “विकिपिडीया’ने आजवर काही अपवाद वगळता, जगभरातील विविध गोष्टींची सर्वाधिक अचूक आणि ताजी माहिती प्रसिद्ध केली आहे. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध असलेली आणि क्षणोक्षणी अपडेट होत असलेली वेबसाईट म्हणून “विकिपिडीया’चा लौकीक आजही कायम आहे; आणि दिवसेंदिवस तो वाढतही आहे.

एकही जाहिरात प्रसिद्ध न करणारी “विकिपिडीया’ ही वेबसाईट म्हणजे अमेरिकेतील “विकिमिडिया फौंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेचे अपत्य आहे. जिमी वेल्स आणि लॅरी सॅनगेर या संगणक अभियंत्यांनी 15 जानेवारी 2001 रोजी विकिपिडियाची स्थापना केली. सुरुवातीला फक्त इंग्लिशमध्ये असलेली ही वेबसाईट आता जगभरातील किमान 45 प्रमुख भाषांमध्ये सेवा देते.

सध्या अशा विविध भाषांत मिळून विकिपिडीयावर 55 दशलख लेख उपलब्ध असून दरमहा किमान 1.7 दशअब्ज नागरिक या ज्ञानभांडाराचा लाभ घेताना दिसतात. त्या दृष्टीने इंटरनेटवर विकिपिडियाचे रॅंकींग 13 असून अनेकदा सर्वाधिक व्हिजिटर्सचा संख्येत ती पहिल्या दहामध्येही असते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.