सर्जिकल स्ट्राईकवर आधारित उरी सिनेमात काम केल्यानंतर चर्चेत आलेला अभिनेता विकी कौशल आता भारत-चीन बॉर्डवर जवानांमध्ये पोहोचला आहे. खास गोष्ट म्हणजे 14 हजार फूट उंचावर जवानांसोबत भारतीय लष्कराच्या वर्दीमध्ये तो दिसला. विकी कौशलने देशाच्या सुरक्षेसाठी 24 तास तैनात असणाऱ्या जवानांचे धैर्य वाढवले. या दरम्यान जवानांनी विकी कौशलसोबत फोटोही काढले. या फोटोंमध्ये जवानांची भेट घेऊन विकी कौशल खूपच खुश दिसत आहे.
विकी कौशलने याचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तो अरूणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये 14 हजार फूट उंचावर भारत-चीन बॉर्डरवर पोहोचला होता. यावेळी विकीने जवानांसोबत काही दिवस घालवले.
विकी कौशलला उरी सिनेमाने प्रचंड प्रसिद्धी दिली. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करत अनेक विक्रम प्रस्थापित केले. या सिनेमाने रिलीज झाल्यानंतर अवघ्या नऊ आठवड्यात 250 कोटींची कमाई केली होती.