‘विकी कौशल’चा सेटवर अपघात, हनुवटीला १३ टाके पडले

मुंबई – अभिनेता ‘विकी कौशल’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान गंभीर जखमी झाला आहे. साहसी दृश्याचं चित्रीकरण करताना दरवाजा आपटून विकीच्या हनुवटीला मोठं फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे विकीच्या हनुवटीला १३ टाके घालण्यात आले आहे.
विकी कौशल सध्या गेल्या पाच दिवसांपासून गुजरामध्ये दिग्दर्शक भानू प्रताप सिंग यांच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे.

एका जहाजावर रात्रीच्या वेळी घडणारा साहसी दृश्याचं चित्रीकरण करत असताना त्याचाअपघात झाला. धावत जाऊन त्याला जहाजाचा दरवाजा उघडायचा होता. ते करत असताना दरवाजा त्याच्या अंगावर आदळला. त्यानंतर विकीला टीम मेंबर्सनी तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. सध्या विकी मुंबईतील त्याच्या फॅमिली डॉक्टरांकडे उपचार घेत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.