फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या रोलमध्ये विकी कौशल

“राझी’ आणि “उरी- द सर्जिकल स्ट्राईक’मध्ये आपल्या उत्तम ऍक्‍टिंगचे प्रदर्शन घडवल्यानंतर विकी कौशल आणखी एका सिनेमामध्ये लष्करी अधिकाऱ्याचा रोल साकारणार आहे. यावेळी तो देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा रोल साकारणार आहे. या आगामी सिनेमाचे शिर्षक अद्याप निश्‍चित झालेले नाही. पण त्यातील फर्स्ट लुक विकीने ट्‌विटरवर रिलीज केला आहे.

सॅम माणेकशॉ यांच्या स्मृतिदिनी त्यांच्यावर आधारित सिनेमातील फस्ट लुक रिलीज करताना मला खूप आनंद होतो आहे, असे विकीने ट्विटरवर म्हटले आहे. हा सिनेमा मेघना गुलझार आणि रॉनी स्क्रूवाला यांच्याबरोबर आपण करत असल्याचेही विकीने म्हटले आहे. सॅम माणेकशॉ यांच्या जाडजूड मिशांप्रमाणेच विकीने मिशा वाढवल्या आहेत आणि त्याच्या कपाळावरही तशाच आठ्या पडलेल्या आहेत.

कार्यालयीन कामकाजात गढलेल्या माणेकशॉ यांच्या लुकमध्ये तो दिसतो आहे. मेघना गुलजार या नव्या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. पण सध्या ती दीपिका पदुकोणला घेऊन “छपाक’च्या कामामध्ये खूप बिझी आहे. तर विकी कौशलदेखील सरदार उधम सिंहांवरील बायोपिकमध्ये काम करतो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.