पिंपरी – पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने रेल्वेखाली आत्महत्या केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महादेव परमेश्वर (वय 30, रा. गांधीनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. कविता महादेव परमेश्वर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी संजय सावळेराम लोंढे (वय 51, रा. चिंचवड) यांनी मंगळवारी (दि. 31) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी लोंढे यांची मुलगी कविता हिला पती महादेव याने वेळोवेळी शाररिक व मानसिक छळ केल्याने तिने चिंचवड येथे रेल्वेखाली आत्महत्या केली. याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी कविता हिने चिठ्ठी लिहून ठेवली आहे.