रोईंगपटू दत्तू भोकनाळच्या याचिकेला पत्नीचा आक्षेप

याचिकेची सुनावणी शुक्रवारी

मुंबई: पत्नीने दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला भारताचा आघाडीचा रोईंगपटू दत्तू भोकनाळ याच्या अडचणी वाढत आहेत. कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेला त्याच्या पत्नीनेच आक्षपे घेत भूमीका मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. याची दखल घेत खंडपीठाने याचिकेची सुनावणी शुक्रवार दि.26 जुलैपर्यंत तहकूब ठेवली.

भारताचा आघाडीचा ऑलिम्पियन आणि आशियाई खेळात सुवर्ण पदक विजेता दत्तू भोकनाळविरूद्ध त्याच्या पत्नीने नाशिक पोलिसांत 22 डिसेंबर 2017 ते 3 मार्च 2018 या काळात आपल्या पतीने आपला प्रचंड मानसिक आणि शारिरीक छळ केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार दत्तू भोकनाळ विरोधात आयपीसी कलम 498(ए) अंतर्गत कौटुंबिक हिंसाचार आणि कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, 2 ऑगस्टला ऑस्ट्रियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोईंग अजिंक्‍यपद स्पर्धेत भोकनाला सहभागी होता यावे म्हणून त्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन आपल्यावरील गुन्हे रद्द करावेत, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी भोकनाळच्या पत्नीने बाजू मांडण्यासाठी न्यायायलयाकडे वेळ मागून घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)