पुणे – विभक्त रहाणारी पत्नी मुलाच्या वाढदिवसानिमीत्त घरी आल्यावर पतीने फाईट मारुन तीचे नाक फ्रॅक्चर केले. ही घटना धायरी येथील जलशक्ती अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी पतीविरुध्द सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल पोपट कांबळे(35,रा.धायरी) असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार राहुल आणी त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद आहेत. त्यामुळे त्याची पत्नी मागील सहा महिण्यापासून विभक्त रहात आहेत. मात्र त्यांचा मुलगा हा राहुल सोबतच रहातो.
मुलाचा वाढदिवस असल्याने राहुलची पत्नी त्याच्या घरी आली होती. याचा राग राहुलला आला होता. त्याने पत्नीला तु वाढदिवस साजरा करण्यासाठी येथे थांबायचे नाही, तु येथून निघुन जा असे म्हणत हाताने नाकावर जोरात फाईट मारली.
यामध्ये नाक फ्रॅक्चर झाल्याने फिर्यादीवर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. बरे झाल्यावर फिर्यादीने पतीविरुद्द तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार कदम करत आहेत.