‘व्हॅलेंटाईन-डे’लाच उघडकीस आलं पत्नीचं अफेअर; पतीने ‘गिफ्ट’ देऊन केली हत्या

नवी दिल्ली – व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी  पतीने रागात पत्नीचा खून  केल्याची धक्कादायक घटना हरयाणाच्या गुरूग्राममध्ये घडली आहे. व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी पती त्याच्या पत्नीसाठी गिफ्ट घेऊन घरी  आला मात्र त्यावेळी घरात  त्याला ती  प्रियकरासोबत दिसली . यावेळी पतीने रागात पत्नीचा गळा दाबला आणि तिची हत्या केली.   

याबाबत स्थानिक पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, सतीशला  ( पती ) संशय होता की, पत्नी रूबीचं अफेअर सुरू आहे. मात्र घरी पत्नीसोबत प्रेयकराला बघताच त्याने पत्नीची हत्या केली. व्हॅलेंटाइन डे १४ फेब्रुवारीला रात्री उशीरा ३० वर्षीय रूबीच्या हत्येप्रकरणी तिचा पती सतीश याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या दोघांच्या लग्नाला ८ वर्ष झाली होती. लग्नानंतर त्यांना दोन मुलंही आहेत. पण यानंतर संशयाने दोघांमध्ये दरी निर्माण झाली. यातच  व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी घरातच घरात  त्याला ती  प्रियकरासोबत दिसली यावेळी त्यांच्यात वाद निर्माण झालं या वादात सतीशने पत्नी रूबीचा तिथे गळा दाबून तिची हत्या केली. फिर्यादीवरून  पोलिसांनी  सतीशविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक करीत आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.