नाशिक – चारित्र्याच्या संशयावरून स्वातंत्र्यदिनी मोबाईलच्या चार्जरने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. शहरातील वडाळा परिसरात ही घटना घडली. निनाज पठाण असे खून झालेल्या महिलेचे नाव असून रिजवान पठाण असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून रिजवान याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.
नाशिक शहरातील वडाळा परिसरात राहणारा रिजवान पठाण हा त्याची पत्नी व मुलांसह राहत होता. तो वारंवार त्याची पत्नी निनाज रिजवान पठाण हिच्या चरित्रावर संशय घेत असे. तिच्याशी वारंवार भांडण करून मारहाण करत असे. मात्र काल मध्यरात्री रिजवानने मोबाईल चार्जरच्या सहाय्याने पत्नी निनाजचा गळा आवळून खून केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.