मुंबई – राज्याच्या विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच राडा पाहायला मिळाला. सभागृह स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घातलेल्या गोंधळावरून विरोधी पक्षाचे १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. १ वर्षासाठी हे निलंबन असणार आहे.
बायको जात चोरते आणि नवरा राजदंड , हे तर बंटी-बबली निघाले#अधिवेशन
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 7, 2021
यातच महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रवी राणा यांनी राजदंड पळवला.याच पार्श्वभूमीवर चाकणकरांनी राणा पती-पत्नीवर ट्विट केलं आहे.
त्यांनी ट्विट केले आहे की,’बायको जात चोरते आणि नवरा राजदंड , हे तर बंटी-बबली निघाले #अधिवेशन ‘ असं म्हणत जहरी टीका केली आहे. दरम्यान, नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलंय तर महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रवी राणा यांनी राजदंड पळवला. यावरून आता मविआ नेत्यांकडून सोशलवर त्यांच्यावर टिका करण्यात येत आहे.