पुणे : पतीच्या अंगाचा वास येत असल्याने पत्नीचा लैंगिक संबंधास नकार; लग्नानंतर केवळ आठ दिवसात…

आजारपण लपविणे पडले महागात : दोन महिन्याचा आत घटस्फोट मंजुर

विजयकुमार कुलकर्णी

पुणे – मुलाच्या शरीराचा वास येत असल्याने लग्नानंतर मुलीने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला. लग्न करताना असलेल्या आजारपणाची माहिती लपविणे पतीला महागात पडले आहे. लग्नानंतर केवळ आठ दिवसात न्यायालयात गेलेल्या प्रकरणात दोन महिन्याच्या आत न्यायालयाने घटस्फोट मंजुर केला.

माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघेही पुणेस्थित परप्रांतीय आहेत. दोघेही अभियंता आहेत. करोना परिस्थितीतात डिसेंबर 2020 मध्ये दोघांचा विवाह झाला. करोना नियमंचे पालन करत केवळ दहा लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. घाईघाईत लग्न झाले. या कालावधीत फारशी चौकशी न करता लग्न करणे अंगलट आले आहे.

मुलगा मोठ-मोठ्याने घोरायचा. त्याच्या शरीराचा वास येत असत. या कारणामुळे तिने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला. केवळ आठ दिवसातच ते दोघे विभक्त राहु लागले. या प्रकरणात तिने शरीर संबंध न ठेवल्याने फसवणूक झाली म्हणून माधवने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. मात्र, पत्नीकडून आजारपण लपविल्याची बाजू न्यायालयात मांडण्यात आली.

फेब्रुवारीमध्ये दाखल झालेल्या प्रकरणाचा निकाल एप्रिलच्य पहिल्या आठवड्यात लागला. न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजुर केला. अर्जदाराकडून ऍड. राहुल जाधव यांनी काम पाहिले. तर, मुलीकडून ऍड. स्नेहा मोहोळ-देसाई यांनी बाजू मांडली. याविषयी मुलीच्या वकील ऍड. स्नेहा मोहोळ-देसाई म्हणाल्या,

लग्न करताना पत्रिका पाहिली जाते. मात्र, त्या ऐवजी रक्तगट आणि इतर वैद्यकीय तपासणी केल्या पाहिजेत. पती-पत्नीने विश्‍वासाने पूर्वी असलेल्या आजारपण, सवयी यांची माहिती दिली पाहिजे. ते लपवता कामा नये. आजारपण आणि इतर गोष्टी लपविल्यास त्याचा परिणाम दोघांच्या आयुष्यावर तर होतोच. पण त्याचबरोबर दोन्ही कुटुंबियांनाही कुटुंबियांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.