50 मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्याच्या पत्नीला अटक

लखनौ – सुमारे 50 मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अभियंत्याच्या पत्नीला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी अटक केली. मात्र तिला अटक करण्याचे नेमके कारण सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अद्याप सांगितले नाही. साक्षिदारांवर दबाव टाकत असल्याच्या आरोपावरून तिच्या मुसक्‍या आवळल्या असल्याचे सूत्रांकडून समजते.

या उत्तर प्रदेशच्या जलसंधारण विभागात कनिष्ठ अभियंता असणाऱ्या राम भुवन यादवने सुमारे 50 मुलांचे लैंगिक शोषण केले. ही सर्व मुलेच होती. त्यांचे लैंगिक शोषण करून त्यांचे रेकॉर्डींग करत असे. या घृणास्पद कृतीचे रेकॉर्डींग तो डार्क वेबला विकत असे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यादवला अटक झाल्यानंतर तातडीने सरकारने निलंबित केले. गरीब घरातल्या पाच ते 16 वयोगटातल्या मुलांना लक्ष बनवत अल्याचे त्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याचे विश्‍वासनीय रित्या समजते. मोबाईल फोन सारखे इलेक्‍ट्रॉनिक गॅझेट आणि रोख रक्कम यांचे आमिष दाखवून तो मुलांना गप्प बसवत असे. त्यामुळेच तो या दहा वर्षात तपास यंत्रणांच्या डोळ्यात धुळ फेकू शकला.

सीबीआयने ऑनलाईनवर होणारे लहान मुलांचे लैंगिक शोषणा थांबवण्यासाठी विशेष पथक उभारले आहे. त्यांनी इंटरनेटवर सुरू असणाऱ्या या प्रकाराचा अनेक दिवस माग काढल्यानंतर अखेर हा आरोपी जाळ्यात सापडला. उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील बांदा येथून त्याच्या निवासस्थानातून त्याच्या विशेष मोहीमेत मुसक्‍या आवळल्या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.