वाईत पाकिस्तानाचा झेंडा जाळला

सातारा – पुलवामा आत्मघातकी हल्ल्याचा रेवलकरवाडी, ता.खटाव येथे पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज जाळून निषेध करण्यात आला. आत्मघातकी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर संतापाची लाट देशभरात ऊसळली होती. ही लाट आता देशातील खेडोपाड्यात अन कानाकोपऱ्यात पोहचली आहे. त्यामुळे सरकारने जनतेच्या भावनेची गंभीर दखल घेवून आतंकवाद संपुष्टात आणण्यासाठी पाकव्याप्त काश्‍मिर ताब्यात घेवून पुढे पाकिस्तानवर चाल केली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हरिदास जगदाळे यांनी केली.

सातारा जिल्ह्याला सैन्यदलाचा मोठा वारसा आहे. विशेषत: खटाव तालुक्‍यातून सैन्य दलात भरती होणाऱ्या युवकांची संख्या लक्षणीय आहे. देशाच्या संरक्षणासाठी ते वाट्टेल ते करण्यास तयार आहेत. मात्र, आता सैनिकांवरच अशा प्रकारे हल्ला होणार असेल तर ती बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खऱ्या अर्थाने देशसंरक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी लष्कराला मोकळीक दिली पाहिजे, असे मत जगदाळे यांनी व्यक्त केले. यावेळी हणमंत कदम, शशिकांत कदम, गिरीधर कदम, बाळासाहेब पाटील, रामदास जगदाळे, प्रल्हाद कापसे, श्रीमंत कदम, विठ्ठल सावंत, खशाबा सावंत आदी. आजी माजी सैनिक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.