धक्कादायक ! पत्नीचा खुन करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अर्धवट जाळून नराधम पती झाला गायब

कोपरगाव – एका नराधमाने आगोदरच्या दोन पत्नींना शाररीक व मानसिक त्रास देवून पळवून लावले तर तिसऱ्या पत्नीचा खुन करुन मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न करुन पळुन गेल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथे घडली आहे.

या घटनेची पोलीसांकडून मिळालेली अधिक माहीती अशी की, कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील विजय उर्फ बंडू आप्पासाहेब गवळी (वय ३५ ) वर्षे हा आपल्या पत्नी समवेत राहत होता. या पुर्वी त्याच्या दोन पत्नीनी याच्या विक्षिप्त स्वभावाला कंटाळून पळून गेल्या तर गेल्या ९ महीण्यापुर्वी नगर भागातील निराधार असलेल्या सुवर्णा हिच्याशी लग्न केले होते.

शिर्डी येथे राहत असताना लॉकडाउनमुळे मढी खु. येथे दोघे राहु लागले मात्र दि. १३ मे १२०२१ रोजी रात्री अचानक दोघा पतीपत्नीमध्ये भांडण सुरु झाले. रागाच्या भारात पती विजय उर्फ बंडू आप्पासाहेब गवळी वर्षे याने पत्नी सुवर्णा विजय उर्फ बंडू गवळी (वय ३०) वर्षे हिच्या डोक्यात टणक शस्त्राने घाव घातल्याने सुवर्णा जाग्यावर गतप्राण झाली.

आपल्या हातून पत्नीलाचा खुन झाल्याचे नराधम पतीच्या लक्षात येताच खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मयत पत्नीच्या मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ टाकुण जाळले व जळालेल्या अंगावरील कपडे बदलुन नवीन कपडे घालुन आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव करीत तशी माहीती नराधम आरोपीने संजीवनी उद्योग समुहात सुरक्षा रक्षक म्हणून कामावर असलेल्या वडिलांना कळवण्यासाठी फोन केला मात्र फोन त्याच्या आईने उचलला.

पत्नीने घरी आत्महत्या केल्याची माहीती त्याने आईला दिली.आरोपीच्या आईने झालेली घटना दुसऱ्या दिवशी आपल्या पतीला सांगितली. वडील आप्पासाहेब गवळी यांनी या घटनेची माहीती गावचे पोलीस पाटील दिलीप कारभारी गवळी यांना कळविल्या नंतर पोलीस पाटील घटनास्थळी जावून घटनेची माहीती दि. १५ मे २०२१ रोजी रात्री उशिरा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना दिली . पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे आपल्या फोजफाट्यासह घटनास्थळी गेले असता मयत सुवर्णाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत व डोक्याला जबर मार लागल्याच्या स्थितीत आढळून आला.

पोलीस कर्मचारी अमर वैजीनाथ गवसणे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विजय उर्फ बंडू आप्पासाहेब गवळी याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असुन आरोपीचा अधिक तपास केला असता आरोपी घटना घडल्यानंतर पसार झाल्याचे समजले. पोलीस निरीक्षक जाधव यांनी आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी पोलीसांचे पथके रवाना करून शोधमोहीम जोरात सुरु केली आहे.

नराध आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने तो या पुर्वी अनेक बायकांना आपल्या जाळ्यात ओडून त्यांना त्रास दिला आहे तसेच मटका,जुगार खेळणे व इतर अवैध काम करण्यात शातीर असल्याची माहीती पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.