नागपूर : पत्नीला राग अनावर पतीची कुऱ्हाडीने वार करून हत्या

नागपूर – नागपूर जिल्ह्यातील काटाेल तालुक्यात पत्नीने आपल्या पतीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पती सारखा चारित्र्यावर संशय घेत असे त्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडणे व्हायची. त्यातूनच हा प्रकार घडला आहे.

सुकलसिंग माखनसिंग सकाेम, वय 49 असे मृत पतीचे नाव आहे. काटाेल पाेलीसांनी आरोपी पत्नीस अटक केली आहे. न्यायालयाने तिला दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.

सुकलसिंग हा पत्नीवर चारित्र्यावरुन सतत संशय घ्यायचा यामुळे या दोघांमध्ये अनेकदा भांडणे होत असे. दरम्यान याच कारणावरून बुधवारी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी पत्नीला राग अनावर झाला व त्यातून तिने आपल्या पतीची कुऱ्हाडीने वार करत हत्या केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.