पत्नीला व्हिडिओ कॉल करून पेटवून घेत आत्महत्या

मुंबई : माहेरी गेलेली पत्नी परत नांदण्यास परत येत नसल्याने निराश झालेल्या तरूणाने पत्नीला व्हिडिओ कॉल करून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. हि घटना मुंबईच्या कांदिवलीतील समतानगरमध्ये घडली.

किसन धोत्रे उर्फ चंदु यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्यांचे पत्नीशी नेहमी वाद होत. त्या भांडणाला कंटाळून 15 दिवसांपुर्वी त्यांची पत्नी माहेरी कुडाळला निघून गेली होती. त्यांना फोन करून किसन यांनी परत येण्यास सांगितले. मात्र दारूचे व्यसन सुटत नसल्याने त्यांनी नकार दिला. त्यांनी रविवारी पत्नीला व्हिडिओ कॉल केला. घरी परत ये अशी विनंती केली.

पत्नीने घरी परत येण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांनी अंगावर केरोसीन ओतून घेतले. तरीही पत्नी नकारावर कायम राहिल्याने त्यंनी स्वत:ला पेटवून घेतले. पेटताच तो ओरडत घराबाहेर आला. शेजाऱ्यांनी आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यात तो 90 टक्के भाजला.

त्याला नजिकच्या रूग्णालयात दाखल केले. मात्र 24 तासांनी त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×